प्रतिनिधी/ उमरगा-
विद्याथ्र्यांच्या व्यक्तीमत्वातील जडणघडणीसाठी व त्यांच्या भविष्याच्या मार्गदर्शनासाठी व्यक्तिमत्व विकास शिबीरे आवश्यक आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो व विद्याथ्र्यांच्या वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या पैलूंचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे ही विद्यार्थयांना दिशा देतात असे मत लेखक तथा ज्येष्ठ विचारवंत अॅड. शितल चव्हाण यांनी व्यक्त केले.
शहरातील पंचायत समिती सभागृहात बुधवारी (ता.08) रोजी नाथ क्लासेसच्या वतीने आयोजित केलेल्या ‘व्यक्तिमत्व विकास’ या व्याख्यानाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, लेखक तथा जेष्ठ विचारवंत अॅड. शितल शामराव चव्हाण बोलत होते.
उपप्राचार्य व्ही.जी तडोळगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोटरीच्या माजी सचिव संजय देशमुख, प्रा. शैलेश महामुनी, दिशा अॅकॅडमीचे संचालक डॉ. राम जाधव, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या रेखा सुर्यवंशी, तालुकाध्यक्षा सुनंदा माने, अनिल श्रिमेवार, नाथ क्लासेसच्या संचालिका अनुराधा पाटील, करीम शेख आदींची यावेळी उपस्थिती होती.
शिक्षणरूपी ज्ञानातुन मानव जातीच्या अडचणी सोडवील्या पाहीजेत. समाज घडविणाऱ्या तरुणांची गरज असुन युवकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्री. श्रीमेवार, श्री. देशमुख, श्री. महामुनी, माजी उपप्राचार्य तडोळगे, प्रा.मुल्ला यांच्यासह अनुष्का चव्हाण या लहान मुलीनेही आपले विचार व्यक्त केले. यापुर्वी घेण्यात आलेल्या विवीध स्पर्धेचे यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक नाथ क्लासेसच्या संचालिका अनुराधा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा सुर्यवंशी यांनी केले. तर मिरा चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक विविध सामजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्याथ्र्यांच्या व्यक्तीमत्वातील जडणघडणीसाठी व त्यांच्या भविष्याच्या मार्गदर्शनासाठी व्यक्तिमत्व विकास शिबीरे आवश्यक आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो व विद्याथ्र्यांच्या वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या पैलूंचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे ही विद्यार्थयांना दिशा देतात असे मत लेखक तथा ज्येष्ठ विचारवंत अॅड. शितल चव्हाण यांनी व्यक्त केले.शहरातील पंचायत समिती सभागृहात बुधवारी (ता.08) रोजी नाथ क्लासेसच्या वतीने आयोजित केलेल्या ‘व्यक्तिमत्व विकास’ या व्याख्यानाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, लेखक तथा जेष्ठ विचारवंत अॅड. शितल शामराव चव्हाण बोलत होते.