प्रतिनिधी /उस्मानाबाद-
जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यामुळे आबालवृद्धांसह नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सह्याद्री फाउंंडेशन व अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटीच्या वतीने माहितीपत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याचा शुभारंभ जिल्हा सामान्य रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात गुरूवारी(दि.९) करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंचल बोडके-मिसाळ, अधिसेविका अमिना शेख, डॉ. तानाजी लाकाळ, परिसेविका कुलकर्णी, सह्याद्री फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख, अंजुमन हेल्थकेअर वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला, सह्याद्री फाऊंडेशनचे समन्वयक गजानन पाटील, समाजसेवा अधीक्षक गुणवंत रसाळ, नितीन कांबळे, विकास बाराते, बालाजी जानराव, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रूग्णालयात आलेल्या रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना उष्माघात टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हा रुग्णालायातील बाह्यरुग्ण विभागात जनजागृतीचा शुभारंभ झाला.
 
Top