प्रतिनिधी / उस्मानाबाद-
शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय सुरू आहे. काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी बुधवारी (दि.८) या मार्गावरील पाहणी केल्यानंतर सुमारे ४८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती असल्याचे समोर आल्याचे त्यांनी कळविले आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, त्यासोबत पाणीगळतीचे फोटोही दिले आहेत. विशेष म्हणजे पालिका दावा करीत असलेल्या टेंपरप्रुफ व्हॉल्व्हलाही मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने पाण्याचे डोह साचल्याचे दिसत आहे.
शहर भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनीही मार्गावरील गळतीची पाहणी करून छायाचित्रण केले. तसेच त्यापैकी काही छायाचित्रे जिल्हाधिका-यांना सादर केले. बुधवारी या मार्गावर पाहणी केल्यानंतर एकूण ४८ ठिकाणी पाण्याची गळती असल्याचे समोर आले आहे. नगर परिषद प्रशासन व नगराध्यक्ष गळती दुरूस्त केल्याचे सांगून शहरवासियांची दिशाभूल करीत आहेत. मागील ८ दिवसांपूर्वी काही ठिकाणचे जुने वॉल्व्ह बदलून नवीन टेंपर वॉल्व्ह बसविण्यात आले. मात्र, नवीन ठिकाणच्या टेंपर वॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून,ही गंभीर बाब आहे. नगर परिषद प्रशासन शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यास पूर्णपणे कुचकामी ठरले असून, शहराला वेळेवर, मुबलक व तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, जनतेचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या तसेच जनतेला आर्थिक भुर्दंड देणाऱ्या नगराध्यक्ष व निष्क्रिय प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय सुरू आहे. काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी बुधवारी (दि.८) या मार्गावरील पाहणी केल्यानंतर सुमारे ४८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती असल्याचे समोर आल्याचे त्यांनी कळविले आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, त्यासोबत पाणीगळतीचे फोटोही दिले आहेत. विशेष म्हणजे पालिका दावा करीत असलेल्या टेंपरप्रुफ व्हॉल्व्हलाही मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने पाण्याचे डोह साचल्याचे दिसत आहे.शहर भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनीही मार्गावरील गळतीची पाहणी करून छायाचित्रण केले. तसेच त्यापैकी काही छायाचित्रे जिल्हाधिका-यांना सादर केले. बुधवारी या मार्गावर पाहणी केल्यानंतर एकूण ४८ ठिकाणी पाण्याची गळती असल्याचे समोर आले आहे. नगर परिषद प्रशासन व नगराध्यक्ष गळती दुरूस्त केल्याचे सांगून शहरवासियांची दिशाभूल करीत आहेत. मागील ८ दिवसांपूर्वी काही ठिकाणचे जुने वॉल्व्ह बदलून नवीन टेंपर वॉल्व्ह बसविण्यात आले. मात्र, नवीन ठिकाणच्या टेंपर वॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून,ही गंभीर बाब आहे. नगर परिषद प्रशासन शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यास पूर्णपणे कुचकामी ठरले असून, शहराला वेळेवर, मुबलक व तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, जनतेचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या तसेच जनतेला आर्थिक भुर्दंड देणाऱ्या नगराध्यक्ष व निष्क्रिय प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई करावी.