उस्मानाबाद/प्रतिनिधी- जिल्हयात दि.05 जून 2019 रोजी रमजान ईद (चंद्रदर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे ) साजरी होणार आहे.
तरी वरील उत्सव जिल्हयात शांततेत पार पडावेत, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे व कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी, यासाठी पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पोलीस उप निरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना दि.03 जून 2019 रोजी रात्री 12.00 ते दि.07 जून 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे अधिकारी प्रदान केले आहेत.
सडकावरील किंवा सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालावेत, त्यांनी त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात किंवा कोणत्या मार्गाने जावू नयेत ते मार्ग विहीत करणे.सर्व मिरवणुकीच्या व जमावांचे प्रसंगी व प्रतिमा पूजनाच्या सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पूजनाच्या वेळी व कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याचे जागी,गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यांवर, नद्यांच्या घाटावर,सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या किंवा कपडे धुण्याच्या ठिकाणी, जागे मध्ये बंदोबस्त सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे,कर्कश वाद्य वाजविणे, यावर नियमन करणे अगर त्यावर नियंत्रण ठेवणे. शासनाने नियुक्त केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 33,34,37, ते 42,45 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशाचे कोणत्याही नियमनात्मक आदेशाचे अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
जी व्यक्ती वरील नियमनात्मक आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल ती व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील,असे पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी कळविले आहे.