उस्मानाबाद/प्रतिनिधी- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्तेस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,पोलीस अधीक्षक श्री. आर. राजा,उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिदार राजकुमार माने,जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
