परंडा / प्रतिनिधी : - महाराष्ट्र राज्य मा. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शांलात परिक्षेमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,परंडा संचलित ग्लोबल ज्युनिअर कॉलेजने आपली १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादित केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व संस्थेच्या सचिव सौ.आशा मोरजकरयांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
" परिश्रमाची असु द्या तयारी ग्लोबलच्या साह्याने घेऊ उंच भरारी ! " कठीण परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश संपन्न केेल्याचे प्रतिपादन गोरख मोरजकर यांनी केले. तर सचोटी, ध्येय प्राप्तीसाठीची जिद्द व अथक प्रयत्न याव्दारे विद्यार्थानी यश संपादित केले.असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव सौ.आशा मोरजकर यांनी केले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी ही यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.