प्रतिनिधी / परंडा
तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी कृषी विभागामार्फत शनिवारपासून ३३ ठिकाणी शेतक-यांची शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यकांमार्फत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. २५ शेतक-यांचा एक वर्ग तयार करून उन्नत शेती समृद्ध शेती पंधरवाड्या अंतर्गत २५ मे ते ८ जून दरम्यानु प्रशिक्षणात जमिनीची मशागत व पेरणी पूर्व तयारी, बियाणे, पाण्याचे योग्य नियोजन तसेच नवीन पिके घेण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.तालुक्यातील दोन गावात एक कृषी मित्र निवड करुन ९६ गावासाठी ४६ कृषी मित्रांची मदत घेण्यात येणार आहे. शेतकरी महिलासाठी हिंगणगाव व पिंपळवाडी या गावात २५ महिलांचा वर्ग तयार करुन शेती शाळेत कृषी सहाय्यक मार्गदर्शन करतील. तुर पिकासाठी २४ गावात कापुस पिकासाठी ३ मका ४, ऊस १ सोयाबीनसाठी एका गावात मार्गदर्शन होईल.तालुक्यात ८२ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असुन त्यापैकी ८०० हेक्टरवर फळबागा आहेत. फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रत्येक गावात कृषी सहाय्यक २० हेक्टर फळबाग क्षेत्र वाढविण्याचा लक्षांक दिली.फळबागाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी कार्यशाळा घेतली होती.
 
Top