प्रतिनिधी /उस्मानाबाद-
|
| राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशन व जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या विद्यमाने दि. १ ते ३ जून दरम्यान येडशी (ता.उस्मानाबाद) येथे ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेकरीता जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्याकरीता दि.२७ मे रोजी येडशी येथील कै. महादेव गव्हार बहुउद्देशीय व्यायामशाळा व क्रीडा मंडळ येडशी येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता निवड समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये अनिल शिंदे, परमेश्वर मोरे, अश्रुबा पवार, राजाभाऊ शिंदे, दीपक माळी यांचा समावेश करण्यात आला आहे. तरी खेळाडूंनी आपआपल्या साहित्यासह या निवडचाचणीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव शरद गव्हार, अनिल अवधूत यांनी केले आहे. |