नळदुर्ग /प्रतिनिधी-
  उस्मानाबाद तालुक्यातील चिखली चौरस्त्यावर कै.दमयंती हरीदास जगदाळे  प्रतीष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक  विवाह सोहळा हजारो व-हाडी मंडळीच्या उपस्थितीत मंगळवार ता.७ रोजी सायंकाळी गोरज मुहुर्तावर पार पडला. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर यांनी नवदांपत्यास आशिर्वाद दिले तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशोक जगदाळे व सौ.आशा जगदाळे  यांनी नववधूंचे कन्यादान केले.
     नळदुर्ग येथील कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील चौथा विवाह सोहळा चिखली येथे पार पडला. दहा हजारपेक्षा जास्त व-हाडी असूनही भोजन व्यवस्था, आसन व्यवस्था व  चांगल्या नियोजनामुळे हा विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला. तामलवाडी, काक्रंबा व नळदुर्ग येथे मागील पाच वार्षापासून विवाह सोहळे होत आहेत माञ   पहिल्यांदाच चिखली येथे चांगल्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.
       यावेळी प्रतीष्ठानचे अध्यक्ष अशोक जगदाळे,  माजी आमदार ओमराजे निंबाळकर,  शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, दिलीप जावळे,  दत्ता सोनटक्के  यांची प्रमुख उपस्थिती  होती.  
 प्रतीष्ठानचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात  प्रतीष्ठानने राबविलेल्या उपक्रमाचा  आढावा घेतला. प्रतीष्ठानच्या वतीने गेली  पाच वर्षीपासून संकटात सापडलेल्या शेतकरी शेतमजूर  यांच्या मुला मुलींचे सामुदायिक  विवाह सोहळ्यात  लावून देण्यात येतात त्याचप्रमाणे ज्या गावात पाणी टंचाई आहे शासणाने अधिग्रहण केले आहे परंतु टाक्या नाहीत अशा ठिकाणी दोन हजार लीटरच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,  जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठीही हौद देण्यात येणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी सांगितले.
जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने नववधूस मणी मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य नवदांपत्त्यांना भेट देण्यात आले.
    विवाह सोहळ्यास महादेव ढोरमारे,  बाबासाहेब जावळे, महादेव सूर्यवंशी, भारत सोनटक्के,  रामदास कोळगे,  बालाजी पवार, कालिदास पाटील, उमेश खंडागळे, महादेव साळुंखे, नरसिंग खुणे, प्रतिभा सरवदे, गौतम सूर्यवंशी, हरिभाऊ भिंगर्डे, नंदकुमार क्षीरसागर नळदुर्ग येथील नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, सरदारसिंग ठाकूर, आमृत पूदाले संतोष पुदाले, किशोर बनसोडे आदीसह बहूसंख्य नागरीक उपस्थीत होते. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी वर्धमान शिरगीरे, दयानंद पाटील, महेश इंगळे, भैया भांडारकर,  बाळासाहेब सुर्यवंशी, नवल जाधव,  बबलू जगदाळे, महेश जळकोटे, रोहीत ठक्कर, सचिन भोई सुजित बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.
 
Top