उस्मानाबाद,दि.8 :- वय वर्ष 45, उंची 166 सेंमी, शरीर बांधा सडपातळ, रंग निमगोरा, केस पांढरे काळे, चेहरा उभट, गुलाबी शर्ट,इटकरी रंगाची अंडरवेअर व बिस्कीट कलरची पॅन्ट घातलेल्या अज्ञात पुरुष इसमाचा मृतदेह करंजखेडा चौकात आढळून आला आहे.
      हा इसम दि.1 मे 2019 रोजी सहा वाजताच्या सुमारास मृत पावला असून पोलीस ठाणे बेंबळी येथे आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. तरी मृताच्या नातेवाइकांनी पोलीस ठाणे बेंबळी येथे ०२४७२-२३५०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वाय.एस.पोठरे यांनी केले आहे.
 
Top