प्रतिनिधी/
उस्मानाबाद |
| बार्शी येथील युवा कृषीनिष्ठ उद्योजक प्रवीण कसपटे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरील प्राइड ऑफ इंडिया-भास्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ मे रोजी पणजी येथील मंगेशकर नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कसपटे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर द्राक्ष व सीताफळे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या प्रगतशील शेतकरी डॉ. नानासाहेब कसपटे यांचे सुपुत्र आहेत. प्रवीण कसपटे यांनी दशकभरात मधुबन ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून कृषीपुरक यंत्र, अवजारे विक्री क्षेत्रात उद्योजक म्हणून स्थान निर्माण केले आहे. तसेच एनएमके गोल्डन-१ या शेतकरीप्रिय सीताफळाची विक्री, संवर्धन व विकसन संशोधन या आघाडीवरही ते कार्यरत आहेत. कसपटे यांनी आजपर्यंत युरोप खंडात व दक्षिण आफ्रिका, चीन, जर्मनीसह १५ देशांचे अभ्यासदौरे केले आहेत. यापुर्वीही त्यांना शेती व उद्योग क्षेत्रातील पुरस्कार मिळाले. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन होत आहे. |
