तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालूक्यातील तेर जवळील तेरणा धरणातून महसूल विभागाच्या पथकाने 2 मोटारी व साहीत्य जप्त केले.
तेरणा धरणात बेकायदेशीर पाणी उपसा होत असल्याच्या संदर्भाने नायब तहसिलदार(पुरवठा)केरूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 9 मे ला  तेरणा धरणात पहाणी केली असता 2 मोटारी,1 स्टार्टर,3 किटकँट, 500 फुट वायर,10 फुट पीव्हीसी पाईप जप्त करून.  पाटबंधारे  उपविभाग ,कळंब क्रमांक 2 अंतर्गत तेरणा जलसिंचन प्रकल्प तेरणा (तेर)यांच्या कार्यालयात कालवा निरीक्षक टी.एस.आंधळे यांच्या ताब्यात देण्यात आल्या.यावेळी तेरचे मंडळ निरीक्षक अनिल तिर्थकर,तेरचे तलाठी श्रीधर माळी,हींगळजवाडीचे तलाठी मुकुंद शिंदे,भिकार सारोळा येथील तलाठी वायचळ आदी उपस्थीत होते.
 
Top