वाशी/ प्रतिनिधी-
वाशी-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विध्यार्थानी भरघोस यश संपादन केले. महाविद्यालयाचा सरासरी निकाल 88.68 टक्के लागला असून गुणवंत विध्यार्थांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा मोळवणे वाशी नगरपंचायतचे नगराध्यक्ष नितीन तात्या चेडे गुणवंत विद्याथ्र्याचे पालक प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.डी उंदरे यांनी केले. गुणवंत विध्यार्थाना नगराध्यक्ष मा.नितीन तात्या चेडे व प्राचार्या डॉ. शारदा मोळवणे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी मुंढे प्रिती, चेडे निकिता, कांबळे नालंदा, बेडके वैष्णवी, जाधव अश्विनी, निरफळ ऋ तुजा, देवडीकर सायली, बोबडे राधा, जगताप प्रांजली, सुरवसे मीरा, मोरे शुभम व जोशी विनय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन चेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील या महाविद्यालयाची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगितले. गुणवंता मध्ये ९० टक्के मुली असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. व महाविद्यालयाने गुणवत्ता अशीच कायम ठेवावी,असे आवाहन केले. व  प्राचार्या आणि सर्व स्टाफ चे अभिनंदन केले. अध्यक्षीय सामारोपामध्ये प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे म्हणाल्या की, महाविद्यालय यापुढे गुणवत्ता कायम टिकून ठेवेल तसेच आम्हाला वेळोवेळी गावकर्यांचे सहकार्य व प्रेरणा मिळत असते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.एम डी उंदरे यांनी केले तर आभार प्रा.भरत जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.संतोष भोसले, प्रा.डॉ अरुण गंभिरे, प्रा.पांडुरंग तांबारे, प्रा.राम जाधव, प्रा राजेश उंदरे श्री.शिवाजी साळुंके, श्री.विजय जाधव, श्री.प्रविण बारगजे, श्री.स्वप्नील शेलकांदे यांनी परिश्रम घेतले.
 
Top