तेर/ प्रतिनीधी-
श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेनीमीत्त तेर येथे आलेल्या दिंडया,पालख्याचे आज काल्याच्या कार्यक्रमानंतर आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या.
श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेनीमत्त राज्याच्या कानाकोप-यातून तेर येथे विविध दिंडया व पालख्याचे आगमन झाले.आज श्री.नरसिंह मंदीरात मुख्य काल्याचा कार्यक्रम झाला.याठीकाणी ह.भ.प शंकरराव महाराज थोबडे(वाशी)ह.भ.प भिमराव महाराज आवटे (बामणी)ह.भ.प.भाऊसाहेब महाराज गोसावी (पंढरपूर)ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे(तेर)यांची हजेरी किर्तमे झाली.यावेऴी मोठया संख्येने भाविकभक्त उपस्थीत होते.यावेळी श्री.नरसिंह मुर्तिला उटी लाऊन अलंकार घालण्यात आले होते. मुख्य काल्याच्या कार्यक्रमानंतर तेरमध्ये आलेल्या दिंडया व पालख्याचे आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या.