प्रतिनिधी/ उमरगा -
 महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटना यांच्या सयुंक्त विद्यमाने तालुक्यातील कलदेव निंबाळा गावात करण्यात येत असलेल्या नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे प्रगती पथावर असून शनिवारी (25) उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तालुका कृषी अधिकारी सुनिल जाधव यांनी पाहणी केली.
सन 1993 च्या झालेल्या प्रलंयकारी भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे पन्नास गावे उध्वस्त झाली होती, त्यावेळी महाराष्ट्र शासन, काही सामाजिक आणि राजकीय संघटनानी पुढाकार घेत हि गावे पुनर्वसन करून दिली मात्र हि गाव ओस आणि पडक्या स्वरूपात गेली 25 वर्ष पडून आहेत. सद्यस्थितीत दुष्काळी स्थिती व पाण्याची टंचाई या भागात निर्माण झाल्याने जलसंधारणाच्या कामावर भर दिला जात आहे. कलदेव निंबाळा गावात जैन संघटनेच्यावतीने जेसीबी मशीन पुरविण्याचे काम केले असून सुजलाम, सुफलाम योजने अंतर्गत नाला सरळीकरण, खोलीकरण आणि गाळ काढण्यासाठी काम करत आहे. सद्या खोलीकरण व सरळीकरण कामे प्रगती पथावर असून शनिवारी उप विभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तालुका कृषी अधिकारी सुनिल जाधव यांनी कामाची पाहणी करुन गावाती ल शेतकऱ्यांनी लोक उपयुक्त कामाला सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी देविदास पावशेरे, कमलाकर पाटील, उपअभियंता सुभाष घंटे, पांडुरंग पाटील,मोहन पाटील,कृषी पर्यवेक्षक आय डी स्वामी कृषि सहायक अतूल गायकवाड,शिवाजी बिराजदार गहिनीनाथ बिराजदार, व्यंकट पाटील उपस्थित होते *भारतीय जैन संघटनेकडे शासनाच्यावतीने गावाती ल नाले खोलीकरण आणि सरळीकरण करण्यात यावे अशी मागणी सरपंच सुनिता पावशेरे यांनी ठराव घेवून केली होती. त्यानुसार तहसील व कृषी कार्यालय यांच्या नियोजनानुसार गावात कामे सुरु असून पावसाळ्यापर्यंत कामे सुरू राहणार असून या कामामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिके च्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याचे सरपंच सुनीता पावशेरे यांनी सांगितले.
 
Top