उस्मानाबाद /प्रतिनिधी- शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न अत्यंत गंभीर असताना मागील अनेक दिवसांपासून शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत असताना नगराध्यक्ष व विद्यमान आमदार यांच्यात सोशल मिडीया वर आरोप प्रत्यारोप चालू आहेत.
मुळातच उजनी पाणीपुरवठा योजना ही मागील सरकारच्या कालावधीमध्ये झालेली असताना व त्या सरकारमध्ये विद्यमान नगराध्यक्ष ही होते.त्यामुळे या योजनेबद्दल विद्यमान आमदार व नगराध्यक्ष यांच्याकडे या योजनेच्या सुरळीतपणे पाणीपुरवठा बाबद ची योजना तयार असने व ती यशस्वी कार्यन्वित होण्याबाबद्ची उपाययोजना असणे आवश्यक होते.
परंतु केवळ आरोप प्रत्यारोप होत आहेत. शहरातील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असताना सर्वांनी मिळून या प्रश्नांकडे जबाबदारीने सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.केवळ आरोप प्रत्यारोप करून सवंग लोकप्रियता मिळवणे थांबवावे व मूळ पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
भारतीय जनता पार्टी पाणी प्रश्नासाठी आवश्यक ती मदत व या पाणी प्रश्नासाठी सरकार कडून मदत मिळवून देण्यास प्रयत्नशील आहे. तरी शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नी कोणीही राजकारण न करता सर्वसामान्यांना नियमित पाणी पुरवठा कसा होईल यासाठी प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे.
 
Top