काटी /प्रतिनिधी-
 तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील  रहिवासी  तथा पुणे  येथील  पिंपरी चिंचवड, भोसरी  भागातील  सायकलींग क्षेत्रातील  ग्रामीण  भागातील   यशस्वी  उद्योजक  श्री. दत्तात्रय सोपान साळुंके वय (80 ) यांचे शुक्रवारी रात्री   8:43  वाजता  अल्पशा आजाराने पुणे येथील  त्यांच्या निवास  स्थानी   दु:खद निधन झाले. तुळजापूर  तालुक्यातील काटी सारख्या   ग्रामीण  भागाचा  स्पर्श  असलेल्या  गावामधून  जाऊन मराठी मानसाने मोठ्या   हिंमतीने  पुण्यासारख्या मोठ्या  शहरांमध्ये  जाऊन अतिशय  प्रतिकूल  परिस्थितीत केवळ इच्छाशक्तीच्या बळावर  पुण्यामधील पिंपरी चिंचवड,  भोसरी  या भागात  जम बसवला  व   एक  यशस्वी  उद्योजक  म्हणून  त्यांनी  पिंपरी चिंचवड,  भोसरी     परिसरात ख्याती  मिळवली होती.  अल्प शिक्षण  झालेले कै.  दत्तात्रय साळुंके  यांनी  1972 च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये गाव सोडून  पुण्यात  फुटपाथवर  सायकल  पंपचरचे दुकान सुरू  करुन  आपल्या  उद्योगाची कारकीर्द  सुरू केली होती. आज पुण्यात पिंपरी चिंचवड, भोसरी  परिसरात  साळुंके  सायकल ट्रेडर्स  म्हणुन दुकान  प्रसिद्ध आहे. या त्यांच्या  उद्योगात  पत्नी,  तीन  मुलांनी चांगली  साथ दिली. आपल्या  जीवनात  आर्थिक उन्नती  सोबतच ग्राहकामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण  करून  यशस्वी  उद्योजक  बनून  तरुणांपुढे त्यांनी आदर्श  घालून  दिला होता.  त्यांच्या  अकाली  जाण्याने हळहळ  व्यक्त  करण्यात  येत आहे.    त्यांच्या पार्थिवावर  शनिवारी सकाळी 10:30 वाजता पिंपरी चिंचवड  मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आले.  त्यांच्या पश्चात पत्नी,  तीन मुले,  एक मुलगी,  जावई,  सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
 
Top