प्रतिनिधी / उस्मानाबाद-
येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलनकडून 'जेथे शाखा तेथे टँकर'द्वारे पाणीपुरवठा या उपक्रमांतर्गत नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या शुभारंभ तालुक्यातील वाघोली येथून करण्यात आला.
तसेच तडवळा, येडशी, दुधगाव या गावांमध्येही टँकरद्वारे सोमवारी (दि.२७) पाणीवाटप करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात ८७ शाखा असल्याने ८७ पाण्याचे टँकर प्रत्येक गावात पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गावाला एक आधार मिळणार आहे. प्रचंड पाणीटंचाईच्या काळात प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींकडून होत असलेल्या कार्याचे जिल्हाभरातुन सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव दादासाहेब अकोसकर यांच्यासह राजेंद्र देशमुख, जमीर शेख, ज्ञानेश्वर चव्हाण, रमेश सुतार, भगवान होगले, ढवळे, विकास धाबेकर, श्याम पाटील, रामलिंग धाबेकर, अभिजित कसबे, शंकर पवार, दशरथ पवार, सिद्धेश्वर सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top