उस्मानाबाद /प्रतिनिधी- प्रमुख खरीप हंगामाचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पीक पद्धती व पूरक व्यवसाय यांचे मार्गदर्शन करण्याकरिता दि.2 जून ते 5 जून 2019 या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
जिल्हा खरीप हंगामपूर्व महोत्सवाच्या आयोजनाकरिता   हॉल, मैदान, मंडप व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वाराची कमान, लाईट व ध्वनीक्षेपण यंत्रणा,जनरेटर व डिझेल व्यवस्था, स्टॉलधारक व शेतकरी यांना पिण्याचे व वापराच्या पाण्याची व्यवस्था, 400 टेबल, 700 खुर्च्या, स्टेज व्यवस्था याकरिता राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरिता सहाय्य आत्मा या अंतर्गत दोन लाख दहा हजार इतक्या तरतुदीपर्यंत जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
या पुरवठादारास महोत्सव संयोजनाचा अनुभव असावा, या व्यवस्थेकरिता लागणाऱ्या साहित्यांचा पुरावा असावा, कृषी विभागाच्या किमान एका जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाचा अनुभव असावा, असे प्रकल्प संचालक आत्मा श्री. जितेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
ही दरपत्रके दि. 28 मे 2019 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आत्मा कार्यालय, रामनगर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर, कापसे बिल्डींग, पंजाब नॅशनल बँकेच्या वर,
 दुसरा मजला, उस्मानाबाद, पिन कोड क्रमांक 413 501 येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठीही येथेच संपर्क साधावा, असे प्रकल्प संचालक   प्रकल्प संचालक आत्मा श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
 
Top