उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्हयातील आजी / माजी सैनिकांना / विधवांना तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांच्या माहे जून 2019 साठी सहामाही बैठकांचे आयोजन संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे.या बैठकांमध्ये आजी / माजी सैनिकांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
तरी संबंधित तालुक्यातील आजी / माजी सैनिकांनी / विधवांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित तहसील कार्यालय येथे खाली नमूद केलेल्या तारखेस सकाळी 11.00 वाजता बैठकीसाठी उपस्थित राहावे.
 तालुक्याचे नाव, बैठकीचा दिनांक, वार पुढीलप्रमाणे.. 1. परांडा, दि.17 जून 2019 तिसरा सोमवार, 2. उमरगा, दि.19 जून 2019 तिसरा बुधवार, 3. वाशी, दि.26 जून 2019 चौथा  बुधवार, 4. लोहारा दि. 28 जून 2019 चौथा शुक्रवार 5. उस्मानाबाद दि.25 जून 2019 चौथा मंगळवार.
संबधितांनी या बैठकांसाठी वेळेवर उपस्थित राहावे.तसेच त्यांनी त्यांच्या तक्रारी /अडचणी लेखी स्वरुपात बैठकीमध्ये सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत यांनी केले  आहे.

 
Top