उस्मानाबाद /प्रतिनिधी -
टपाली मतदान पत्रिका मिळाली नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागले. सदरील टपाली मतदान पत्रिका का मिळाली नाही याची चौकशी करुन टपाली मतदान पत्रिका मिळवुन द्यावी अशा मागणीचे निवेदन शिंगोली ता.उस्मानाबाद येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेतील सहशिक्षक कैलास शानिमे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती केल्यामुळे आपण 12 नंबर फार्मही भरुन दिला होता. परंतु प्रत्यक्ष मतदानादिवशी टपाली मतदान पत्रिकाच मिळाली नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित रहावे लागले. याबाबत तुळजापूर तहसिल कार्यालयात चौकशी केली असता ते उस्मानाबाद कार्यालयाशी संपर्क करण्यास सांगतात. दोन्ही कार्यालयातील संबंधित टोलवा टोलीवी करीत आहेत. त्यामुळे सदरील प्रकाराची चौकशी करुन टपाली मतदान पत्रिका मिळवून द्यावी अशी मागणी श्री. शानिमे यांनी निवेदनात केली आहे.