उस्मानाबाद /प्रतिनिधी
 लोकसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल मंगळवारी (दि.९) आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात विधानसभा मतदार संघाचे इव्हीएम व डब्लूपीएटी सिलिंग प्रक्रियेसाठी ९ ते १० एप्रिल दरम्यान शिबिरात केंद्रीय अधिकारी झोन २७ साठी शाखा अभियंता लघुपाठबंधारे उपविभागाचे आर. व्ही. ईरुदे यांची नेमणूक होती. परंतु, मंगळवारी (दि.९) सिलिंग प्रक्रियेसाठी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुरध्वनीद्वारे सूचना देऊनही अनुपस्थित आहेत. राजेंद्र गिरी यांच्या फिर्यादीवरुन आर. व्ही. ईरुदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 
 
Top