उस्मानाबाद-
जिल्हा प्रशासनातर्फे आज मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला संबोधित करताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थितांना “18 एप्रिलला मी मतदान करणार आहे! तुम्ही पण करणार ना” असे आवाहन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधीक्षक श्री.उमेश घाटगे,लीड बँक व्यवस्थापक निलेश विजयकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सोमनाथ रेड्डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अजिंक्य पवार, कार्यकारी अभियंता अनिल सगर, श्री.उमेश झगडे, श्री.संतोष कुलकर्णी, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री.गजानन सुसर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, रोहिणी कुंभार, अधीक्षक श्री.दिनकर होळकर, आर.ए.काळे, सहायक प्रशासन अधिकारी प्रदीप जाधव, विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, आरसेटी चे संचालक मिलिंद सावंत, नाबार्डचे व्यवस्थापक श्री.विनायक कोठारी, स्वीपचे नोडल अधिकारी तहसिलदार अभय मस्के, आत्माचे प्रकल्प संचालक श्री.जितेंद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.चिमणशेटये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चंचल बोडके, तहसिलदार विजय राऊत, नायब तहसिलदार चेतन पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांची मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.
या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सकाळी 7 वाजता ऑफिसर क्लब येथून झाली. ही रॅली ऑफिसर क्लब या ठिकाणाहून सुरु होवून छत्रपती शिवाजी हायस्कूल मार्गे बार्शी नाका-भोसले हायस्कूल-आंबेडकर चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मानवी साखळी आणि मतदान शपथेचा कार्यक्रम संपन्न झाला. या रॅलीसाठी उपस्थित अनेकांनी जिल्हा क्रीडा संकुलातील मतदानयंत्राच्या प्रतिकृती समोर उभे राहून सेल्फी देखील काढले.
या रॅलीसाठी शासनाच्या सर्व विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिक,तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले होते. या आवाहनाला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद देत अनेकांनी आपली उपस्थिती दर्शविली.
घोषणांनी दुमदुमलं अवघं उस्मानाबाद शहर
18 एप्रिल रोजी मतदान करा, लोकशाही बळकट करा. आपली जबाबदारी व अधिकार, भारतीय लोकशाहीचा आधार. प्रगत भारताचे स्वप्न होईल साकार, वापरु मतदानाचा अधिकार. मतदानाचा अभिमान, हीच असे लोकशाहीची शान. आपल्या मताने बदल घडेल, देश प्रगतीची पायरी चढेल. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. निर्भय होऊन मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा. सोडा सारे काम-धाम, मतदान करणे पहिले काम. चला मतदान करुया देशाची प्रगती घडवू या. नवे वारे नवी दिशा मतदानच आहे उदयाची दिशा. जागरुक नागरीक होवू या, अभिमानाने मत देवू या, आदी घोषवाक्यांनी उस्मानाबाद शहर दुमदुमले. त्याचबरोबर मतदान करण्याविषयी विविध संदेश लिहिलेल्या फलकांनीही उस्मानाबाद शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मतदान करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी रॅलीकरिता उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, नागरीक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांनीही उपस्थितांशी संवाद साधून 18 एप्रिल रोजी सर्वांनी निश्चितपणे मतदान करावे, संविधानाने दिलेली ही अमूल्य संधी वाया घालवू नये असे आवाहन केले.
या रॅलीत शहरातील विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, पत्रकार, श्रीपतराव भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी विदयालय, शरद पवार हायस्कूल, धाराशिव प्रशाला, शम्सूल उलूम उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्रशाला, आर्य चाण्यक्य विदयालय, भाई उध्दवराव पाटील हायस्कूल, आर.पी.कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, के.टी.पाटील बी-फार्मसी कॉलेज, या शाळा-कॉलेजेसचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी खंडागळे, टी.एफ.काझी, संतोष माळी, दत्तात्राय थेटे, सोमनाथ घोलप, चंद्रकांत चिलवंते, हनुमंत लाटे, किशोरी जोशी, दैवशाला शिंदे, दैवशाला हाके, जयमाला शिंदे, विशाल सूर्यवंशी आदींनी पुढाकार घेतला.