उस्मानाबद शहरातील क्रांती चौक येथे दुपारी ५ वाजता प्रमुख पाहुणे अर्जुनराव सलगर,बाळासाहेब वाघमारे,दशरथ कसबे,सोलापुर मनपाचे नगरसेवक अजित गायकवाड,रॉकी बंगाळे,एम आय एम जिल्हाध्यक्ष जाफर मुख्तार मुजावर,गौतम कांबळे,बाळासाहेब बनसोडे,रवि माळाळे,प्रमुख मार्गदर्शक धनंजय नाना शिंगाडे,मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवि कोरे आळणीकर,प्रमुख सल्लागार लक्ष्मण माने,रावसाहेब शिंगाडे,शिनानंद कथले,संतोष हंबीरे,बबन वाघमारे,नितिन शेरखाने,मुकेश नायगावकर,आदिंच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख मान्यवर श्री अर्जुनराव सलगर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे " शिका,संघटित व्हा,व संघर्ष करा"नुसार सर्व युवकांनी याचा अवलंब करून आदर्श घडविला पाहिजे,तसेच रूढी परंपरा जपत तरूणांनी उद्योग व्यवसायाकडे,वळले पाहिजे.या भव्य मिरवणुकीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.यानंतर दशरथ कसबे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.स्वच्छ आचार स्वच्छ विचार घेऊन युवकांनी समाजात वावरले पाहिजे तरच आपला समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही,असे संबोधित केले आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत प्रमुख मार्गदर्शक धनंजय नाना शिंगाडे व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी शाल फेटा व श्रीफळ देऊन स्वागत केले
यानंतर मिरवणुक क्रांती चौक येथुन काळा मारूती चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन ञिशरण पंचशिल मानवंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.या मिरवणुकीस जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेश शिंगाडे,उपाध्यक्ष भाई फुलचंद गायकवाड,शफीक टकारी,कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे,मिरवणुक प्रमुख राहुल बनसोडे,बापु काकडे,प्रमुख सल्लागार बबन वाघमारे,अलीम पठाण,तसेच सांस्कृतिक प्रमुख सतिश ओव्हाळ,सागर चव्हाण,सुबोध सोनवने,आदिंची प्रमुख उपस्थित होती.