शहरातील बालाघाट महाविद्यालयाच्या मैदानात शनिवारी (दि.२७) सायंकाळी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या विवाह सोहळयात १४ गरजू, गरीब जोडप्यांचे लग्न लावण्यात आले, वधू-वरांना अाशीर्वाद देण्यासाठी गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सनई चौघड्याच्या निनादात व पवित्र मंगलाष्कांच्या स्वरात विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी अशोक जगदाळे, गोकुळ शिंदे, कमलाकर चव्हाण, शिवाजीराव मोरे, रामचंद्र आलुरे, रमेश भूमकर, डॉ. सिद्रामप्पा खजुरे, विजयकुमार सरडे, गणेश सोनटक्के, शिवाजी मिटकर, नालंदा पाटील, साहेबराव घुगे, सत्यवान सुरवसे, शिवाजी वऱ्हाडे, शाहुराज पाटील, दत्तात्रेय राजमाने, काशिनाथ शेटे, अशोकराव पुदाले, तन्वीर अली खतीब, सुधीर हजारे, अजहर जहागीरदार, शब्बीर कुरेशी, दयानंद पाटील, वर्धमान शिरगीरे, कल्याणराव लोदगे, दयानंद मुडके, शहर भाजपचे अध्यक्ष पद्माकर घोडके, बाळासाहेब कुलकर्णी, भय्या भंडारकर, श्री पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात अशोक जगदाळे, अशाताई जगदाळे, नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांच्या हस्ते सर्व वधूंचे कन्यादान करण्यात आले. ½ उस्मानाबाद. सोमवार, २९ एप्रिल २०१९ दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले. नववधू-वरांना संसारोपयोगी साहित्याची भेट, मान्यवरांनी दिला आशीर्वाद सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण १४ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. याप्रसंगी जोडप्यांना मनी मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. सर्व प्रकारचे संसारोपयोगी साहित्य यावेळी रुकवतात मांडण्यात आले. जगदाळे कुटुंबीयांच्या वतीने प्रत्येक जोडप्यांना हे साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये संसारात आवश्यक असणारी भांडी तसेच अन्य साहित्याचाही समावेश आहे. नव्याने संसार सुरू करणाऱ्या या नवदांपत्यांना मान्यवरांनी आशीर्वाद दिला. तसेच संसार सुरू करताना त्यांना हातभार लागावा, यासाठी भेटरुपी साहित्य देण्यात आले. |