परंडा /प्रतिनिधी
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना,रासप-आरपीय महायुती चे उमेदवार ओमराराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ परंडा येथे भाजपा प्रमुख पदाधिकांऱ्यांची बैठक दि.8 रोजी आयोजित बैठकीत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी मीच उमेदवार समजून कामाला लागा असे अपस्थित कार्यकर्त्यांना आपल्या संवाद या निवासस्थानी बैठकीत सांगितले.
 परंडा तालुक्यातील भाजपाच्या सर्व कार्यकर्तांनी महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी ताकतीने कामाला लागावे.केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला भक्कम नेतृत्वच सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी उस्मानाबाद लोकसभेचा प्रतिनिधी म्हणुनओमराजे निंबाळकर यांना दिल्लीला पाठवायचं आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणी राज्य सरकारचा कोट्यावधी निधी आपण आणला आणी जिल्हाच्या प्रगतीची अलेख आसाच अखंडीत ठेवण्यासाठी मी स्वत: उमेदवार आहे समजून ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सक्रिय होण्याचे अवाहन आ.ठाकूर यांनी उपस्थीत पदाधिकारी कार्यकत्र्यांना केले आहे.
 यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे ,भाजपा नेते  राजाभाऊ चौधरी,बाजार समितीचे सभापती संतोष सुर्यवंशी.शिवसेनेचे जि.प. चे गटनेते दत्ता (आप्ण्णा) साळूंके ,चंद्रकांत काकडे,अँड भालचंद्र औसरे,भाजपा नेते भागचंद नेटके, मुकूल देशमुख, अँड गणेश खरसडे ,नगरसेवक अन्वर लुकडे, महावीर तनपूरे, अरविंद रगडे,गणेश राशनकर, समीर पठाण, नगरसेवक विठ्ठोबा मदणे, नगरसेवक मुस्सा हन्नुरे, अमोल गोफणे, तानाजी पाटील, कांतीलाल पाटील, पोपट गोडगे,सनी अहिरे आदी मान्यवर बहू संख्येने उपस्थित होते.

 
Top