प्रतिनिधी/ तुळजापूर-
सोलापूर येथील एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयात रविवारी (दि.७) झालेल्या कॅम्पल्स मुलाखती मे महाविद्यालयातील तब्बल ३३० विद्याथ््र्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या लेसमेंट विभागाच्या वतीने घेण््यात आलेल्या या मुलाखतीमध््ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरपर के कुल 14 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावून मुलाखती घेतल्या.
 सोलापूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकीसाठी कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून रोजगार प्राप्त होण्याचा हा विक्रमच म्हणावा लागेल. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 3, मेकॅनिकल व कॉम्प्युटर सायन्स साठी 3, तसेच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ब्रांच साठी आठ अशा एकूण 14 कंपन्यांचा समावेश होता. यावेळी सर्व कंपन्यांच्या अधिका-यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी कपिलेश स्वामी यांनी केले.
यावेळी विद्याथ्र्यायांनी टाटा मोटर्स, टाटा याझाकी, भारत फोर्झ, वोडाफोन आयटी क्यूब, अशा नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी मुलाखतीनंतर 330 विद्याथ्र्यांयांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून  जुलै महिन्यात त्यांना कंपनीमध्ये रुजू होण्यास सांगितले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कॅम्पस ड्राईव्हसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा कपिलेश स्वामी,प्रा. अविनाश लावणीस, प्रा विशाल भानवसे, अतुल सुरवसे, प्रा.परमानंद पवार, प्रा महांतेश पाटील, प्रा यशराज बनसोडे यांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्लेसमेंट टीमचे संस्थेचे सचिव श्री संजय नवले व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top