ग्रामविस्तार अधिकारी देविदास चव्हाण यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी/ तुळजापूर
 रत्नागिरी जिल्हयातील दापोली येथे ग्रामसेवक संघटनेची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.
यावेळी  राज्याध्यक्ष एकनाथराव जी ढाकणे साहेब राज्य सरचिटणीस प्रशांत जामोद राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम राज्यातील पदाधिकारी च्या बैठकीमध्ये मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्षपदी पंचायत समिती तुळजापूर येथे ग्राम विकास अधिकारी पदावर असलेले श्री देवीदास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यास सूचक म्हणून उदय शेळके संपर्कप्रमुख व अनुमोदक म्हणून श्री चांद कुरेशी विभागीय सचिव अमरावती यांनी स्वाक्षरी केली सर्वांच्या मताने देविदास चव्हाण यांची औरंगाबाद मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्ष सुजित खरात बापू अहिरे लक्ष्मण गलगुंडे पदाधिकारी उपस्थित होते सध्या ग्राम विकास अधिकारी म्हणून अणदूर येथे ग्रामपंचायत कार्यरत आहेत उस्मानाबाद जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस म्हणून गेली 14 वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

 
Top