वाशी/प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील पारगाव येथे महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत हे पारगाव येथे आले होते.यावेळी महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या असे आवाहन केले. आणि नंतर विकास काय असतो ते मी तुम्हाला दाखवतो.असे सांगितले त्याचबरोबर विरोधकांनी आरोप न करता विकासावर बोलावे असे सांगितले तसेच ज्या आघाडी सरकारने उस्मानाबाद मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत हे सर्व प्रश्न येणा-या पाच वर्षांमध्ये मार्गी लावले जातील असा विश्वास पारगाव येथील नागरीकांना दिला.
यावेळी शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यासह जिल्हाप्रमुख गौतम लटके, कॅप्टन संकेत चेडे, वाशी चे तालुकाप्रमुख अॅड. सत्यवान का गपाट भूम चे तालुकाप्रमुख सुरेश कांबळे, भाजपाचे तालुकाप्रमुख सचिन इंगोले, युवा सेना तालुकाप्रमुख बाळासाहेब मांगले, रवींद्र धर्माधिकारी शिवहार स्वामी, सतीश शेरकर,  विकास तळेकर,  बाळासाहेब काटवटे, डॉक्टर आनंत कुलकर्णी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुजित सुकाळे, लक्ष्मीकांत आटोळे,  महादेव आखाडे, बंडू मुळे, बंडू खोसे , श्रीराम घुले, रमेश बनसोडे , लहुदास चव्हाण, तानाजी कोकाटे, फुलचंद बाराते,  सुशांत कोकणे, आशोक जाधव,  महेश कोकने, भारत गायकवाड, विठ्ठल मोटे, सरपंच अशोक लाखे, दिनकर शिंदे,  नितीन रणदिवे, दशरथ नाळपे, बाबासाहेब गावडे यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
 मुस्लिम नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश.
यावेळी दोन वर्षापासून शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या सौ. सविता तळेकर यांनी केलेल्या समाज कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पारगाव येथील तीस मुस्लिम नागरिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित मुजम्मिल पठाण,आयुब पठाण, इब्राहिम शेख,हसन पठाण, सोहेल पठाण, अल्ताफ शेख,आतिक शेख,जावेद शेख, साहिल पठाण, यांच्यासह इतर मुस्लिम नागरिकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

 
Top