लोहारा/प्रतिनिधी-
तालुक्यातील जेवळी व परिसरात शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे केबल चोरीची घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील जेवळी येथील पश्चिम शिवारात मागील काही दिवसांपूर्वी रात्री येथील कृष्णाखोरे साठवण तलावाखाली असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील दोन विद्युत पंपाचे केबल तसेच काही शेतकऱ्यांच्या विहीर व कूपनलिकेपासून ते विद्युत खांबापर्यंतचे केबल कापून अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. याच शिवारात दोन- तीन महिन्यापूर्वी असे केबल, वीज कंपनीच्या वीज वाहिनी, विद्युत पंप चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात केबल चोरांची टोळी सक्रिय असून सुनियोजित केबल चोरीच्या घटना पुन्हा-पुन्हा घडत आहेत. तक्रार करूनही चोरीचा तपास लागत नसल्याने शेतकरी केबल चोरीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत नसल्याचे दिसून येत आहे. केबल चोरांचे बंदोबस्त करण्याचे आवाहन पोलिसासमोर निर्माण झाले आहे. 
 
 
Top