उस्मानाबाद/प्रतिनिधी- लोहारा तालुक्यातील धानुरी येथे मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्राचे पाठीमागून बटन बंद करून बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि. १८ रोजी दुपारी १.३० ते १.४५ वाजेदरम्यान घडली. धानुरीच्या मतदान केंद्रावर संजय हरी साळुंखे याने स्वत:चे मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट तिरपे करून मागील मशीनचे बटन आडवे करून मशीन बंद केले. यामुळे १० मिनिटे मतदान प्रक्रिया बंद पडली. यावरून सूचना व नियमांचे उल्लंघन करून बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी संजय साळुंखे विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात आनंद राठोड (रा. नांदगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. |