प्रतिनिधी/ उस्मानाबाद
वाशी तालुक्यातील इसरूप येथे दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि.१५ रोजी सायंकाळी घडली.
गोरख शिवाजी जाधवर हे महादेव मंदीराकडे जात असताना alt147तुम्ही आमचा लेझीम डाव ओलांडुन का चालला' असे म्हणुन बापुराव अनपड, सचिन अनपट, नितिन अनपट, सुब्राव अनपट, संदीप कदम, हरीदार कदम, शंभु अनपट, विठ्ठल अनपट, श्रीमंत कदम व इतर १० ते १५ महिला व पुरूषांनी फिर्यादीस शिविगाळ करून काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच याप्रकरणी वैजनाथ लक्ष्मण अनपट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना व साथीदारांना सतीष जाधवर, नितेश जाधवर, महादेव जाधवर, महेश जाधवर, संदीपान जाधवर, विकास जाधवर, हौसेराव जाधवर, प्रकाश जाधवर, पोपट जाधवर, कुमार जाधवर, दशरथ जाधवर, लिंबा जाधवर, मच्छिंद्र जाधवर, संतोष जाधवर, गोरख जाधवर,भैय्या जाधवर, राम जाधवर व इतर २५ ते ३० यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. 
 
Top