उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून उमरगा- लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये मतदारांशी संपर्क साधून विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अनेक गावांमध्ये संपर्क दौरा, कॉर्नर बैठक , तर जवळपास आठ ते दहा प्रचार सभा घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले आहे . 
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी -शिवसेना- आरपीआय -रासप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिवसाला वीस ते बावीस गावे याप्रमाणे गेल्या दोन दिवसांमध्ये उमरगा लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. या गावातील शिवसैनिकांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. प्रत्येक गावात जाऊन तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न  उमेदवारांनी केल्यामुळे येथे सेनेचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरगा- लोहारा तालुक्यातील भाजप, आरपीआय, रा स प, शिवसंग्राम हे सहयोगी पक्ष ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या मतदारसंघातून ओमराजे यांना मताधिक्य निश्चित मिळेल असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
 
Top