उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसर व्यवस्थापनशास्त्र  विभाग व छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि.२०) 'बौद्धिक संपदा हक्क' (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स) या विषयवार राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजक डॉ संजय अस्वले व संचालक डॉ सुयोग्य अमृतराव यांनी दिली. 
    राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता उदघाटन करण्यात येईल. परिसंवादातडॉ व्ही एस मंगनाळे, डॉ एन बी दहिभाते, डॉ महेश कटाळे, डॉ एम के पाटील, संचालक डॉ अनार साळुंके, डॉ अनिल जाधव, आर एम इंगळे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभरात  'बौद्धिक संपदा हक्क' विषयी चर्चा, सादरीकरण करण्यात येईल. तसेच सदरील कार्यक्रमात या वर्षी पीएच. डी. मिळालेल्या
परिसरातील शिक्षकांचा सत्कार देखील आयोजित केला आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर, रोटरी क्लब उमरगा, नॅशनल करिअर सर्व्हिस, भारती विद्यापीठ सोलापूर, मराठवाडा ऍक्सलेटर
फॉर ग्रोथ अँड इन्क्युबुशन कॉन्सिल आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवादास आयोजित आहे. प्राचार्य डॉ जी एच जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजनाची जय्यत तयारी सुरु आहे. तर डॉ पी एस माने, डॉ व्ही एस इंगळे, डॉ डी  व्ही थोरे, डॉ  व्ही. डी. देवरकर,  प्रा.विक्रम शिंदे, प्रा. सचिन बस्सैये, प्रा. वरुण कळसे आदींसह सदस्य आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमात वर्षभरात पीएच. डी. मिळालेल्या
जिल्ह्यातील शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर परीसंवाद हा इंकूबेशन सेंटर अँड इंडस्ट्री अकडमिक प्रक्टिसेस, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे होणार आहे. परिसरातील सर्व उद्योजक, व्यापारी, संशोधक, शिक्षक व विद्यार्थी यांनी सदर परीसंवादासाठी उपस्थित रहावे आसे आवाहन आयोजकानी केले आहे.
 
Top