प्रतिनिधी/ लोहारा
येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या संचालिका सविता शहाजी जाधव यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक महिला गौरव पुरस्काराने (२०१९) सन्मानित करण्यात आले. रविवारी ( दि.२१) लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
चौथ्या राष्ट्रीय प्युपिल्स ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेतर्फे हा पुरस्कार शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अविरत व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना alt147महिला गौरव पुरस्कारalt148 देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी लातूर येथील ग्लोबल नॉलेज स्कूलचे संस्थापक तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रमेश बिरादार, आनंद धुमाळ, डॉ. सुभाष हुलपले, संस्थेचे अध्यक्ष डाॅ. महेश मोटे, सचिव महमंदरफी शेख, सदस्या सायराबानो शेख, सल्लागार, शिवराम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या संचालिका सविता शहाजी जाधव यांना शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल आणि संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर जाऊन यश प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच ग्रामीण भागातील मुलां-मुलींना दर्जेदार इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल alt147 राज्यस्तरीय सांस्कृतिक महिला गौरव २०१९alt148 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका माधुरी चोबे, स्कूलचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी तसेच पालकांमधून अभिनंदन होत आहे.