प्रतिनिधी | उस्मानाबाद
|
शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने दि.२८ रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित या उत्सव सोहळ्यास अर्जून सलगर, बाळासाहेब वाघमारे (सोलापूर), दशरथ कसबे (सोलापूर), अिनल गायकवाड, रवी गायकवाड (नगरसेवक सोलापूर) आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ४ वाजता भीमनगर, क्रांती चौक येथून सुरू होणाऱ्या या मिरवणुकीस बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष रवी कोरे आळणीकर, मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, सचिव नितीन शेरखाने, सल्लागार लक्ष्मण माने आदींनी केले आहे. |