उस्मानाबाद/प्रतिनिधी   
 समाजाचा संसार उभा करण्यासाठी बाबासाहेबांचं स्वतःच्या संसारकडं दुर्लक्ष झालं समाजाच्या समग्र विकासाचा लढा  लढून लोकशाहीचा चार्ट बाबासाहेबानी बनवला , लोकशाही  म्हणजे समता  माणूस कितीही मोठा असला तरी आपले स्वतंत्र त्याच्या चरणी अर्पण करू नये , कोणतीही  माणूस आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊन सुखी जीवन जगू शकत नाही . म्हणून भाकरीपेक्षा स्वसभिमान महत्वाचा आहे देशात आज विभूती पूजा चालू आहे यक्ती पूजा हुकूमशाहीकडे जाते व्यक्ती पूजेने लोकशाही धोक्यात येते भारतीय समाजामध्ये समतेचा अभाव आहे  क्षेणीबद्ध   विषमतेवर आधारित समाज आहे , भारतीय जीवन विसंगतीने भरलेले आहे लोकशाहीची समान मूल्ये आपण नाकारत आहोत जीवनाच्या सर्व क्षेत्रात  समता आणि बंधुता रुजवली पाहिजे आजच्या समस्येची सोडवणूक बाबासाहेबांच्या विचारात आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ. मनोहर सिरसाट यांनी केले. 
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच च्या उस्मानाबाद वतीने  महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त २५ व २६ एप्रिल २०१९ या  दोन दिवसीय व्याख्यान मालेचे  आयोजन करण्यात आले होते , 
      दुसऱ्या दिवशी "बहुजन वंचितांची सामाजिक चळवळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर " या विषयावर प्रा.डॉ. मनोहर सिरसाट बोलत होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. प्रदीप रोडे सर (अध्यक्ष देवगिरी प्रतिष्ठान बीड ) हे होते त्यापुढे प्रा.डॉ. मनोहर सिरसाट म्हणाले कि बाबासाहेबानी शेती ,शेतकरी  व शेतमजूर यांचा विचार करून एवढे उभारले ,ज्यांचे शोषण झाले त्यांचे पोषण व्हावे बाबासाहेबांच्या जम्मामुळे आमच्या जगण्याचा आयाम झाला  प्रगल्भ समाज नव्या पिढीला दिशा देतो अशा विचार प्रवर्तक मांडणी प्रा.डॉ. मनोहर सिरसाट यांनी केली आणि उपस्थितांची मने जिंकली . 
       यावेळी कर्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रोडे सर यांनी व्याख्यानाचे महत्व पटवून दिले व्याख्यानांमुळे परिवर्तन कसे घडते ते त्यांच्या बीड शहरातील अनेक उदाहरणे देऊन सांगितले होऊ शकत है ! हा कांशीरामजीचा  विचार घेऊन मी आणि माझे  या पलीकडे जाऊन मी पणा सोडून काम केले पाहिजे संकटातून रचनात्मक काम होण्याची गरज त्यांनी प्रतिपारीत केली. 
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजनानंतर श्रीलंकेतील साखळी बाँम्ब स्फोटातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे यांनी विचारमंचाच्या वाढीसाठी संघटनात्मक बदलाची गरज प्रतिपारीत करून नवीन कार्यकर्त्याना संधी देऊन रचनात्मक कार्याला गती देण्याचे विषद केले आपली भूमिका स्पष्ट केली . 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा. महेंद्रकुमार चंदनशिवे यांनी केले सूत्रसंचालन राहुल जगताप यांनी केले तर आभार प्रा. अंबादास कळासरे  यांनी मानले . 
शेवटी राष्ट्रगीताने कर्यक्रमाची सांगता झाली
 
Top