प्रतिनिधी / कळंब
तालुक्यातील डिकसळ येथील शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१८) लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर शेतात जाऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुंदर श्रीमंत अंबिकरकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या नावे गट नंबर १२५ मध्ये दीड एकर कोरडवाहू जमीन आहे. सततची दुष्काळी परिस्थिती व नापिकीला कंटाळून सुंदर अंबिरकर यांनी हे पाऊस उचलल्याचे समजते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. 
 
Top