उस्मानाबाद/प्रतिनिधी:- 
जिल्ह्यात दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदारांच्या सोयीसाठी मतदारांना मतदान चिठठया दिल्या जात आहेत, मात्र नागरिकांनी या मतदान चिठ्ठ्या आपल्या ओळखीचा पुरावा नाही, हे लक्षात घ्यावे.
        मतदान करण्‍यासाठी जे मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करू शकणार नाही त्यांनी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र/राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र, बँक, पोस्ट ऑफिस द्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी कोणताही एक दस्तावेज सादर करून नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात, फक्त हेच दस्तावेजमतदार ओळख पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
 
Top