परंडा / प्रतिनिधी  -
येथील स्वामी समर्थ मंदिर मध्ये श्री स्वामी समर्थाचा प्रगट दिना निमित्त परिते ता. माढा ह.भ.प. सौ. सरिताताई व्यवहारे यांचे काल्याचे  कीर्तन झाले.
सकाळी श्री स्वामी समर्थ मुर्तीस रुद्राभिषेक डाॅ संजय जहागीरदर यांच्या हस्ते करण्यात आला.
ह.भ.प. सौ. सरिताताई व्यवहारे यांच्या सुश्रावय कीर्तन नंतर महाआरती व नंतर सर्व उपस्थित भक्ताना महाप्रसाद देण्यात आला. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल मुगळीकर, हेमंत जकातदार, नाना गवारे, काका गवारे, ह.भ.प.बालाजी महाराज बोराडे, सौ. सुनिता जहागीरदर, सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी,सौ.निरा गवारे,  सौ. अंजली माने, सौ. प्रिती  मुगळीकर, सौ. सारीका पवार , भाग्यवान  गाडगे, सौ. लता कांबळे, सौ. रेखा जमदाडे यांनी परिश्रम घेतले. 
कार्यक्रमासाठी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या पत्नी सौ.शैलाभाभी ठाकुर,माजी नगरसेविका सौ. हेमाताई ठाकुर यांच्या सह शहर व परिसरातील महिला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
Top