प्रतिनिधी / परंडा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपक मरवाळे व तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.७) पथनाट्याद्वारे परंडा येथे मतदार जनजागृती करण्यात आली.
परंडा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि बस स्थानक या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथकाचे साहाय्यक अधिकारी डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी आयोजन केले होते. या वेळी साहाय्यक अधिकारी प्रा. अशोक दुनघव उपस्थित होते.
डॉ.चंदनशिवे यांनी जनजागृती संदर्भात प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. या पथनाट्यामध्ये १३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे एका मताची किंमत दाखवून दिली. शहरातील तसेच ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मतदारांनी पथनाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.
 
Top