उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरुवाडी येथील दोन गटात झालेल्या वादावरून पोलिस प्रशासनाने एका गटाच्या दबावावरून दुसऱ्या गटातील तेरा लोकांना विरूध्द ॲट्रॉसिटी व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय दलित समाजाबद्दल चुकीची माहिती पसरावून तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. यामुळे अनेक निष्पाप लोकांना पोलिस ठाण्याच्या आवारात मारहाण केली. वास्तविक पाहता गुरूवाडी येथील वाद स्थानिक पोलिस पाटील, तंटामुक्त समिती व सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मध्यस्थीने मिटलेला होता, मात्र, गावाबाहेरील काही समाज विध्वंसक लोकांनी हा वाद मिटवू न देता यास जातीय स्वरूप देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. पोलिस प्रशासनानेही अशा शक्तीच्या दबावास बळी पडून निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकाराचा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून घटनेतील ॲट्रॉसिटी व विनयभंगाचे खोटे गुन्हे रद्द करावे, सवर्णावर झालेल्या मारहाण प्रकरणी दोषीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर हंसराज गायकवाड, बाबूराव शहापुरे, संजय पवार, माधव पवार, उमाकांत माने, चंद्रशेखर पवार, सुधाकर पाटील, विनोद कोराळे, प्रदीप भोसले, अप्पू स्वामी, बालाजी वडजे, सुमित घोटाळे, रोहित सूर्यवंशी, आकाश चव्हाण, प्रदीप शिंदे, राहुल सुरवसे, अमोल पाटील, विष्णू पांगे, अमित चव्हाण, योगेश तपसाळे, अभिजित चव्हाण, दतात्रेय शिंदे, आकाश शिंदे, शरद पवार यांच्यासह ५० मराठा बांधवांच्या सह्या आहेत. |