भूम /प्रतिनिध-
शहरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ किरकोळ मारहाण व चाकूचा धाक दाखवून पावनेदोन लाखांचा दरोडा व मागील दोन दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ गाडी घरासमोरून चोरी गेल्याने शहरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण.पोलीस कर्मचारी बंदोबस्त साठी गेल्याने घटनास्थळी पोहचणे व पेट्रोलिंग साठी कसरत करावी लागते ?
अधिक माहिती अशी आहे की शेंडगे गल्ली मधील लिंबराज बाबुराव घोलप हे आपल्या घरचे चॅनल गेट बंद करून कुलर लावून झोपले असता रात्री 2 वाजण्याच्या सुमारास गेट तोडून घरात प्रवेश करून आतील घराचे कुलूप तोडून प्रवेश करत असताना चोराच्या हातातील काठी कुलर वर पडली असता लिंबराज जागे झाले व त्यांनी कोण आहे असे विचारणा केली असता गपचूप झोप असे सांगत लहान दगडाने मारले व आरडाओरडा चालूच ठेवल्याने अखेर चोरांनी पळ काढलाव घोलप बचावले पुढे जाऊन विजय नगर मधील मोहन हावळे यांच्या घराचे पाठीमागील चिकन रूम चे दार उचकटून प्रवेश केला व डबे आदी उघडून तपासणी केली काही हाती न लागल्याने हावळे यांचे मुले झोपलेल्या रूम मध्ये जाऊन त्यांच्या तोंडावर चादर टाकून मुलीच्या गळ्याला चाकू लावला तर विवेक हावळे ला मारहाण केली व इतर रूम चे बाहेरून कडी लावली व विना हालचाल करता गप्प बसा नाहितर घात पात करू असे सांगत लोखंडी रॉड ने मारहाण केली व घरातील सोने व रोख रक्कम असे 178 हजार रुपये घेऊन गेले असे विवेक हावळे यांनी सांगितले तर दरोडा घालणारे हे घोलप ला मराठीत बोलले तर हावळे ना हिंदीत बोलत होते अखेर ही दरोडा घालणारी टोळी महाराष्ट्राची होती की इतर राज्यातली असे तर्क वितर्क शहरात लावले जाऊ लागले आहेत।
या संदर्भात भूम पोलिसात विवेक हावळे यांनी अर्ज दिला आहे की परंतु दुपार पर्यंत गुन्हा नोंद नव्हता।
 
Top