उस्मानाबाद / प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या उजणी धरणाच्या पाणीपुरवठ्याचे दोन पंप सध्या सुरू करण्यात आले असुन दररोज ८ ते १० एमएलडी पाणी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.
उजनी धरणातून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून विस्कळीत झाल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.यासाठी शहराला पाणीपुरवठा करणा-या उजनी धरणाच्या पंप हाऊसमध्ये नव्याने बसवलेल्या तीन पंपापैकी दोन पंप शनिवारपासून सुरू करण्यात आले आहेत. यातून दररोज आठ ते दहा एमएलडी पाणी शहराला येणार आहे.
हळू हळू दुसराही पंप सुरू करण्यात येणार असून शहराला १ मे पासून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष निंबाळकर यांनी सांगितले. आज दुपारी साडेबारा वाजता उजनी येथील दोन पंप सुरू केल्यानंतर सायंकाळी शहरातील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी दाखल झाले.
 
Top