प्रतिनिधी/ उस्मानाबाद
मराठवाड्यातील एकमेव बहुराज्यीय, अग्रनामांकित उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेने चालू आर्थिक वर्षत मार्च अखेर २०० कोटीपेक्षा अधिक नवीन व्यवसाय करून २५ करोड १३ लाखांचा नफा मिळविला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मंदी, कमी होणरी गुंतवणूक व दुष्काळी स्थिती, अश प्रतिकुल स्थितीवर मात करून बॅंके ने ही गगनभरारी घेेतली असून २ हजार ४०० कोटींच्या बॅकिंग व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांनी दिली आहे.
उस्मानाबाद जनता बॅंकेच्या महाराष्ट्रात २८ व कर्नाटकात २ अश एकुण ३० शाखा आहेत. मुख्यालय उस्मानाबाद येथ्े असून बॅंकेने एटीएम सेवा, कोअर बॅंकिंग सोल्यशुनचा अवलंब केला आहे. बॅंकेचे स्वत:च्या जागेत अद्ययावत डी.आर.साईट कार्यरत आहे. बॅंकेच्या उस्मानाबाद, लातूर, उदगीर, बाशी, बीड, सोलापूर, पंढरपूर शाखांसाठी स्वमालकीच्या इमारती असून चालू वर्षात भूम, परंडा, चाटी गल्ली सोलापूर येथ्ील शाखेसाठी इमारती खरेदी केल्या आहेत. बॅंकेने सेंट्रलाईजड क्लिअरिंग चेक्स, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस, एटीएम आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.अद्ययावत व अत्याधुनिक बॅंकिंग सेवेमुळे ग्राहकांना जलद व गतिमान सेवा मिळत आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाने पथदर्शी धोरण समोर ठेवून वाटचाल केल्याने बॅंकेच्या व्यवसायात ५ वर्षत लक्षणीय वाढ झाली असून बॅंकेचया वतीने सभासदांना सन २०११-१२ पासून सरासरी ८ प्रतिशत प्रमाण लाभांष वितरित करण्यात आला आहे. बॅंक संशयित बुडीत निधीत ११९ कोटी ७५ लाखांची तरतूद करून बॅंकिंग क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देत आहे. चालू वर्षात बॅंकेने १७ कोटी २ लाख रूपयांचा आयकर जमा करून २५ करोड १३ लाखाचा नफा मिळविला ओ. बॅंकेने ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, सभासदांना सर्व प्रकारची कर्जे व ठेवीच्या विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. बैंकेच्या थकीत कर्जदारांनी वसुलच्या कार्यवाहीचा कुट अनुभव टाळण्यासाठी वेळेत कर्ज परतफेड करावी व बॅंकेच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन बॅंकेचे चेअरमन मोदाणी यसांनी केले आहे. बॅंकेचे अध्यक्ष मोदाणी, उपाध्यक्ष व्ही.जे.शिंदे, यांच्यासह सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी शोीाा वारद, सरव्यवस्थापक एम.बी.गायकवाड के मार्गदर्शन मे बॅंकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.