प्रतिनिधी /उस्मानाबाद
आजोळी राहण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायाधीशांनी ५ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.२० जुलै २०१६ रोजी दुपारी पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना आरोपी महेश राजेंद्र शेटे (रा. वडगाव ज.) याने घरात घुसून विनयभंग केल्याने मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी आरोपीस अटक करून तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले. प्रकरणाची विशेष सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांच्यासमोर सुनावनी झाली. यावेळी समोर आलेले साक्षी-पुरावे तसेच सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. जयंत देशमुख यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून शिक्षा सुनावण्यात आली. 
 
Top