प्रतिनिधी/ परंडा
येथील गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयातील तीन विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) उत्तीर्ण झाले आहेत. यशाबद्दल प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. 
नेट परीक्षेत काजल मेहेर हिने रसायनशास्त्रात अखिल भारतीय पातळीवर ९८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. मोहसीन शेख याने अखिल भारतीय पातळीवर १२ क्रमांक प्राप्त केला असून शेख बद्रोद्दीन याने १८ क्रमांक प्राप्त केला आहे. एकाच वेळी महाविद्यालयातील तीन विद्यार्थी सीएसआयआर (विज्ञान व औद्योगीक संशोधन परिषद) घेतलेल्या नेट परीक्षेत यशस्वी झाले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्वक शिक्षण, कॉपीमुक्त परीक्षा आणि महाविद्यालयीन शिस्त या त्रिसूत्रीच्याच्या आधारे यश संपादन केले. यामुळे विविध विभागातील अनेक विद्यार्था यशस्वी होत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार झाला. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. अक्षय घुमरे, प्रा. जगन्नाथ माळी, प्रा. अमर गोरे पाटील, प्रा. डॉ. महेशकुमार माने आदी उपस्थित होते. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी यशस्वी विद्यार्थाचे कौतुक केले. 
 
Top