उस्मानाबाद -
तालुक्यातील कामेगाव येथील रहिवाशी व अनगर येथील बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे रसायनशास्र विभागप्रमुख, प्रा. विशाल नानासाहेब कदम यांना रसायनशास्त्र विषयात नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली आहे़
प्रा. कदम यांनी सोलापूर विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. ए. घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली 'सिंथेसिस अ‍ॅन्ड कॅरेक्टरायझेशन आॅफ नॉव्हेल थर्मली स्टेबल पॉलीमर' या विषयावर संशोधन केले. यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे, प्रा. डॉ. व्यंकटरमण, कुलगुरु एस. आय. पाटील, एस. व्ही. लोणीकर, डॉ. पी. पी.वडगावकर, डॉ. एम. एस. बडीगर, डॉ. सी. एस. रोडे, डॉ. राजू चिकटे आदींची उपस्थिती होती़ या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील, संस्थेचे चेअरमन विक्रांतराजे पाटील, सचिव अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सुर्यवंशी, चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक विश्वजित लटके, रामचंद्र पाटील यांनी कौतुक केले आहे़
 
Top