प्रतिनिधी/उस्मानाबाद -

विविध वािहिन्यांवर सुरू असलेले अोपिनियन पोल हे ओपिनियन मेकिंग पोल आहेत. याद्वारे वस्तुस्थिती लपवून माध्यमाद्वारे भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीची या ओपनियन मेकिंग पोलचे आकडे आता बदलू लागले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला.
ते आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उस्मानाबादेत आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरील आरोप केला. या वेळी अधिक माहिती देताना मलिक म्हणाले की, प्रसार माध्यमातून सुरुवातीला दाखविण्यात आलेल्या अोपनियन पोलमधील आकडे आणि दोन दिवसांपूर्वीची आकडे तपासा यामध्येच तुम्हाला सदरील ओपनिअन मेकींग पोलचा अंदाज येईल. २०१४ च्या निवडणुकीत देण्यात आलेल्या आश्वासनावर सत्ताधारी काहीच बोलायला तयार नाहीत, त्यांच्याकडे विकासकामाचे मुद्देच नसल्याने ते वैयक्तिक नेत्यांवर टीका करत आहेत. देशात ६ लाखावर गावे आहेत. त्यांना आम्ही वीजपुरवठा केल्याचे सांगत आहेत. वास्तविक पाहता २०१४ पूर्वी आघाडी शासनाच्या काळातच यापैकी केवळ १८ हजार गावे वीजपुरवठा करण्यापासून वंचित होती. म्हणजेच उर्वरीत गावांमध्ये आम्ही वीज पुरवली होती. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात २०१४ मधील आश्वासनांच्या पूर्ततेबाबत कोठेच उल्लेख नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर आमच्या सरकारमधील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामे दिले. या सरकारच्या काळात चार मोठे हल्ले होऊनही कोणीच जबाबदारी घेत नाही. उलट दहशतवादी हल्ल्यात दुपटीने वाढ झाली, जवान शहीद होण्याच्या घटनाही दुपटीने वाढल्या, युद्धबंदीचे उल्लंघन सहा पटीने वाढले. देशात सरकारविरोधात वातावरण असून राज्यात महाआघाडी २८ ते ३० जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. 
 
Top