उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील पानवाडी या छोटेश्या खेड्यातील कु.प्रांजली प्रेमनाथ डोंगरे  ही विद्यार्थिनी परभणी जिल्ह्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय माळीवाडा (ता. पाथरी), या शाळेत  इयत्ता 1 ली वर्गात शिकत असून श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा 2019 या स्पर्धा परीक्षेत 100 पैकी 100 गुण घेऊन राज्यात सर्वप्रथम क्रक्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच ओमराजे सोमनाथ डोंगरे हा 6 वी वर्गात शिकणारा विद्यार्थी याच श्रेया परीक्षेत राज्यात 7 वा व परभणी जिल्ह्यात सर्वप्रथम क्रक्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल परभणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती सौ.भावनाताई अनिलराव नखाते व जिल्हा परिषद सदस्य सौ मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी या यशस्वी विद्याथ्र्यांचे  व त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन केले. शिवाय शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष चिंचाणे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी वांगीकर यांनी देखील शाळेच्या वतीने यशस्वी विद्यथ्र्यासह पालकांचा मोठा सत्कार केला.
पानवाडी सारख्या छोट्या गावातील या बहिण भावंडाने परभणी येथील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत आपल्या गावाचे नावलौकिक वाढवल्या मुळे पानवाडीसह उस्मानाबाद तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
 
Top